युडीआयएआयकडून “आधार’चा डेटा लीकचा इन्कार

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात युडीआयएआयद्वारे आधार कार्ड पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आल्यानंतर दोन दिवसांनीच डेटा लिक झाल्याचे उघडकीस आले आहे. दिल्लीतील झेडडी नेट डॉट कॉमने दावा केला आहे की, आधारचा डेटा कोणीही सहजपणे हॅक करून आधारकार्ड धारकाची गोपनीय माहिती मिळवू शकतो. मात्र, युडीआयएडीने हा दावा फेटाळून लावला आहे.

युआयडीएआयने म्हटले आहे की, आधारची सर्व माहिती सुरक्षित आहे. कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही. ज्या पोर्टलने या संदर्भातली बातमी दिली ती निराधार आणि बेजबाबदारपणे दिलेली बातमी होती. ज्या बातम्या देण्यात आल्या आहेत त्यात काहीही तथ्य नाही, असेही युआयडीएआयने स्पष्ट केले.

सरकारी कंपनीत तंत्रज्ञानाचा अभाव असल्याने हा डेटा चोरीला गेल्याचे वृत्त या पोर्टलने दिले होते. तसेच आम्हीच या संबंधीचा शोध घेतला असेही या पोर्टलने म्हटले होते. पण त्यांनी दिलेली ही सगळी बातमीच बिनबुडाची आहे. जर सरकारी कंपनीत तंत्रज्ञानाचा अभाव आहे तर लाखो आधार कार्डांचा डेटा चोरीला गेला असता. मात्र तसे घडलेले नाही असेही युआयडीएआयने म्हटले आहे.

कोणत्याही व्यक्तीकडे तुमचा आधार कार्ड क्रमांक असेल तरी सर्व माहिती गोपनीयच राहणार आहे. या क्रमांकामुळे कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराचा किंवा फसवणुक होऊ शकत नाही. आधार कार्ड तयार करताच हाताच्या अंगठ्याचा ठसा, डोळ्यांच्या रेटिना सेव्ह केलेला असतो. तसेच वन टाइम पासवर्ड शिवाय आधार कार्डचा क्रमांक वापरून कोणताही व्यवहार करता येत नाही. त्यामुळे असा वृत्तांवर विश्‍वास ठेवू नये, असेही युआयडीएआयने स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)