युट्युब पाहून छापल्या चक्‍क बनावट नोटा

पिंपरी – सोशल साईट युट्युब वरचे व्हिडिओ पाहून देहूरोड येथील एका 21 वर्षीय तरुणाने चक्क 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या. मात्र पोलिसांना याचा सुगावा लागला आणि पोलिसांनी त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्या. शार्टकट कमाईच्या नादात आपण हे कृत्यकेल्याची कबुली तरूणाने दिली आहे.

सोहेल सलीम शेख (वय-21, रा.गांधीनगर वस्ती, देहूरोड) असे आरोपीचे नाव आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी शंकर सपते यांना आरोपी मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकातील एका दुकानात बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्या अंगझडतीतून 200 रुपयांच्या सात बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

शेखने काही दिवसांपूर्वी युट्युबवर नोटा छापण्याची चित्रफीत पाहिली होती. त्यानंतर त्याने नवीन प्रिंटर विकत घेतला. आणि 200 रुपयाची नोट स्कॅन करून त्याची कलर प्रिंटवर कॉपी काढून बनावट नोटा तयार केल्या. नोटा तयार केल्यानंतर त्या शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडे त्याने वटविण्यास सुरुवात केली. त्यातूनच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक अश्विनी जगताप, शंकर पाटील, सुनील पवार, शंकर संपते, रमेश चौधर आदींनी ही कारवाई केली.

छोटे आणि वृद्ध दुकानदार टार्गेट
शेख याने या नोटा वटविण्यासाठी छोटे आणि वृद्ध दुकानदार टार्गेट केले. त्यांच्याकडून काही वस्तू घेत त्यांना या नोटा दिल्या आणि बाकी पैसे परत घेतले. गेल्या 15 दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अशा दोनशे रूपयांच्या नोटा मिळाल्या असल्यास अशा दुकानदारांनी देहुरोडच्या समर्थ पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)