‘युटर्न’

आयुष्य जगत असतांना काही लोक साथ देतात काही लोक अनुभव देतात. आयुष्य जगताना अनेक अडचणी, अनेक आव्हानं कमी-अधिक गंभीरपणे समोर असतातच. पण काही वेळा आयुष्य तिथंच थांबतं, साचून राहतं. अशा वेळी त्यातून बाहेर कसं पडायचं, हा प्रश्‍न निर्माण होतो. पण त्याही प्रश्‍नाचं उत्तर मिळवता येतं, एक भलं मोठं वळण घेऊन, एक यू-टर्न घेऊन! आयुष्यातला हा यू-टर्न प्रत्येकाचं आयुष्य घडवत आलाय, यशस्वीपणे मुक्कामापर्यंत पोहोचवत आलाय.

प्रत्येकाच्या आयुष्याचे मार्ग वेगवेगळे. काही स्वीकारलेले, काही आपलेसे करावे लागलेले. पण त्या एका क्षणी तुम्ही कोणता निर्णय घेता यावर तुमचा भविष्यकाळ निश्‍चित होत असतो. काहींच्या आयुष्यात नेहमी फक्त पायवाटच असते. सतत खाचखळगे, काटेकुटे, न संपणारा रस्ता, मुक्कामाच्या शोधात फिरणारं आयुष्य. तर काही वेळा चालत असताना येतो डेड एंड. थबकून जातं आयुष्य. पुढे काहीही नाही. फक्त अंधार! या तीनही प्रकारच्या रस्त्यांवरून जाताना तसंच चालत राहणं किंवा तिथंच थांबणं हा एक पर्याय असतो. पण एक संधी आयुष्य तुम्हाला देतं. यू-टर्नची. तो रस्ता जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकतो. तुमच्या आयुष्यातला तो टर्निग पाइंट ठरतो. हा यू-टर्न तुम्ही निवडता. किंवा आयुष्य तुमच्यासाठी निवडत असते. तो स्वीकारायचा असतो. चॉइस इज युवर्स! हेच आयुष्य आहे, हीच जगण्याची मजा! जगातल्या अगदी थोर-मोठया व्यक्तीपासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत हेच घडत आलंय.गांधींना महात्मा पदापर्यंत नेणारा टर्निग पॉइंट होता, साऊथ आफ्रिकेतील ट्रेनमधून त्यांना ढकलून दिलं जाणं, सिद्धार्थाला बुद्ध बनवणारं ते वळण होतं, तर वाल्याचा वाल्मीकी झाला तो त्याच्या पापात भागीदार होण्यास नकार देणारे त्याच्याच बायको-मुलांचे निर्धार. या तिघांनीही मग एक निर्णय घेतला आणि त्यातून इतिहास घडला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मित्रहो आपणही आयुष्य जगात असतांना अनेक रस्ते येतील पण आपला रस्ता योग्य तोच निवडायचा, आणि त्या रस्त्यावर चालत जाऊन सर्वोच्च जागेवर पोहोचायचे हे प्रत्येकाचे ध्येय पाहिजे. आयुष्य खूप छान आहे त्याचा मनसोक्त स्वाद घ्या, आपले जीवन समाधानी बनवा, दुःखाचा एक लवलेशही लागू देऊ नका, संकटांचा सामना करा ,प्रत्येकाचे आयुष्य कधीना कधी बदलणार आहे. काट्यांमधून आपली वाट काढत आपलं आयुष्य जगा, निस्वार्थी ताठ मानेने जगा दुसऱ्यांच्या तोंडावर स्मितहास्य आणणार आपलं आयुष्य बनवा.

– प्रा.भगवान केशव गावित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)