युगुलांचा ‘ब्रेकअप’ प्रेमाचा ‘रिव्हेंज पॉर्न’

इंटिमेंट सीनचे छायाचित्र, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून बदनामी


सायबर क्राईममध्ये प्रकरणात वाढ

पुणे – प्रेमाच्या आहारी जाऊन प्रेमी युगूल इंटिमेंट सीनचे छायाचित्र किंवा व्हिडीओ काढत असते. बहुतांश चित्रीकरण मोबाईलमध्ये एकमेकांच्या सहमतीने काढले जाते. तर, कधी चोरी-छुपे चित्रीकरण केले जाते. जो पर्यंत प्रेमाच्या अणाभाका घेतल्या जातात तो पर्यंत सर्वकाही सुरळीत चाललेले असते. मात्र एकदा का ब्रेकअप झाला की सुरू होतो बदला घेण्याचा प्रवास. यासाठी प्रेमात असताना काढलेल्या इंटिमेट सीनच्या छायाचित्र किंवा व्हिडीओचा वापर केला जातो. ही छायाचित्र किंवा व्हिडीओ व्हॉटस अॅप किंवा फेसबुकसारख्या सोशल माध्यमांवर व्हायरल केली जातात. यातून संबंधित पार्टनरची बदनामी केली जाते. यामुळे अनेकांचे वैवाहिक आयुष्यही बरबाद झालेले दिसते.

यासंदर्भात सायबर क्राईम सेलकडून माहिती घेतली असता, सायबर क्राईमचाच हा प्रकार असून वर्षभरात असे अनेक गुन्हे दाखल होताना दिसतात. सायबर क्राईमकडे आजवर अशा सत्तर एक गुन्ह्यांची नोंद आहे. याला सायबर क्राईमच्या भाषेत “रिव्हेंज पॉर्न’ म्हणतात. सध्याची तरुण पिढी जितक्‍या झटपट प्रेमात पडते, तितक्‍याच लवकर त्यांचे ब्रेकअपही होताना दिसते. महाविद्यालयाच्या तीन-चार वर्षांच्या काळात अनेकदा साथीदार बदलण्यात येतात. तर, काही जण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत किंवा नंतरही “लिव्ह इन’मध्ये राहणे पसंत करतात. मात्र, ही प्रेमप्रकरणे तकलादू असल्याने अनेकदा ब्रेकअप सारख्या घटना घडतात. ब्रेकअप झाल्याचा फटका दोघांनाही मानसिकरित्या बसलेला असतो. यातून काही सावरतात तर काही बदल्याच्या भावनेने पेटून उठतात. ब्रेकअप झाल्याचा राग मग सोशल मीडियाद्वारे काढला जातो. याचा सर्वाधिक फटका तरुणींना बसतो. त्यांची सोशल मीडियावर बदनामी केली जाते, त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट किंवा छायाचित्र टाकली जातात. तसेच एखाद्याकडे प्रेमात असतानाचे इंटिमेट सीनचे चित्रीकरण असेल तर ते व्हायरल केले जाते. मित्र-मैत्रीणी किंवा नातेवाईकांच्या व्हॉटस अॅपवर ते व्हायरल केले जातात. यामुळे संबंधित तरुणीची बदनामी होते. तर ज्या तरुणींचा विवाह झाला असेल त्यांचे वैवाहिक जीवनही बरबाद झालेले दिसते.

फेसबुक फ्रेंडकडून अत्याचाराचे प्रकार
फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुली व तरुणींवर अत्याचार होण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे फेसबुकवर मैत्री करताना जपून करावी तसेच फेसबुक फ्रेंडला भेटायला जाताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलीस नेहमी करतात. मात्र, आभासी जगतात झालेल्या या मैत्रीला तरुण पिढी खरी मैत्री समजून बळी पडतात. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती फेसबुकवर चांगले प्रोफाईल ठेऊन अल्पवयीन मुली व तरुणींचा विश्‍वास संपादन करतात. यानंतर त्यांना मैत्रीची गळ घालून अनोळखी शहरात बोलावून घेतात. तेथे प्रत्यक्षात गेल्यावर फेसबुक फ्रेंडचा खरा चेहरा समोर येतो. अनेकदा या तरुणींना लुटण्याबरोबरच अत्याचारही केले जातात. यासंदर्भातील एक घटना नुकतीच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)