युगांडाच्या उपराष्ट्राध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : मुंबई येथे युगांडा – भारत गुंतवणूक परिषदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले युगांडाचे उपराष्ट्राध्यक्ष एडवर्ड किवानुका सेकांडी यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेतली.

भारत आणि युगांडाचे संबंध नेहमीच मैत्रीपर राहिले असून भारतीय वंशांच्या लोकांचे युगांडाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे सेकांडी यांनी सांगितले. भारतीय उद्योजकांनी युगांडामध्ये मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारतीय लोकशाही व्यवस्थेचे कौतुक करताना युगांडातील जिल्हा तसेच ग्रामस्तरावर निवडणूक प्रणाली तसेच प्रशासन व्यवस्था बळकट करण्यासाठी भारताने सहकार्य करावे अशी विनंती उपराष्ट्राध्यक्षांनी केली.

भारत आणि युगांडामध्ये थेट विमानसेवा सुरु करण्याबद्दल प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारताच्या ‘मेक ईन इंडिया’च्या धरतीवर युगांडाने ‘बाय युगांडा, बिल्ड युगांडा’ हे धोरण अंगिकारले असल्याचे सांगून त्याद्वारे स्थानिक वस्तू व सेवा यांना प्रोत्साहन देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक निवडणूक प्रक्रीयेच्या मजबुतीकरणासाठी युगांडाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा करावी व त्यासाठी महाराष्ट्रात आपले शिष्टमंडळ पाठवावे असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी यावेळी सांगितले. युगांडाने महाराष्ट्रासोबत विद्यार्थी देवाण-घेवाण तसेच सांस्कृतिक देवाणघेवाण सुरु करावी अशीही सुचना राज्यपालांनी यावेळी केली. युगांडाच्या भारतातील उच्चायुक्त एलिझाबेथ पावला नेपेयोक तसेच मानद वाणिज्यदूत मधुसूदन अग्रवाल यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)