युक्रेनच्या सीमाभागात मार्शल लॉ लागू 

कीव (युक्रेन) – युक्रेनची तीन जहाजे रशियाने ताब्यात घेतल्यानंतर युक्रेनने सीमाभागात मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनच्या संसदेमध्ये याबाबतचा ठराव आज मंजूर करण्यात आला. अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांच्या विनंतीवरून सीमेवर 30 दिवसांसाठी मार्शल लॉ लागू करण्याबाबतचा प्रस्ताव युक्रेनच्या संसदेत मांडण्यात आला. त्यावर झालेल्या जोरदार चर्चेनंतर 276 खासदारांनी या प्रस्तावाच्या बाजूने मत दिले.

रशियाच्या नौदलाने रविवारी युक्रेनची जहाजे ताब्यात घेतली. क्रिमियाच्या समुद्र किनाऱ्याजवळ अझोव समुद्रात रशियाच्या हद्दीमध्ये या जहाजांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याचा आरोप रशियाने केला होता.”मार्शल लॉ’नुसार लष्करात नागरिकांना भरती करून घेणे, माध्यमांवर नियंत्रण आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जातात. रशियाकडून पायदळाचा हल्ला होण्याच्या भीतीपोटी युक्रेनने संपूर्ण देशाऐवजी केवळ सीमा भागात “मार्शल लॉ’ लागू केला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)