युक्ती अन् शक्तीच्या जोरावर सर्वांगीण विकास साधा

खा. उदयनराजे भोसले : अभिषेक यादव युवा मंचचा उपक्रम कौतुकास्पद

कवठे, दि. 21 (प्रतिनिधी) -युवकांनी क्रिकेटसारख्या खेळाच्या माध्यमातून मैदानावर स्वत:ला सशक्त बनवावे. आजचे युवक हेच उद्याच्या भारताचे सशक्त नागरिक असतील, त्यासाठी मैदानी खेळांकडे युवक आकर्षित करण्याचे अभिषेक यादव युवा मंच करत असून हे काम प्रशंसनीय आहे, असे उद्गार खा. उदयनराजे भोसले यांनी काढले.
सुरुर, ता. वाई येथील श्रीशिवाजी विद्यालयात क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत ओझर्डे वॉरियर्स हा संघ प्रथम क्रमांक पटकावित 21 हजार रुपयांचे पारितोषिक आणि चषकाचा मानकरी ठरला. द्वितीय क्रमांकांचे 15 हजार रुपये पारितोषिक व चषक सुरूर क्रिकेट क्लब सुरूर यांना मिळाले. तर तृतीय क्रमांकाचे 10 हजार रुपयांचे पारितोषिक व चषक कवठे क्रिकेट क्लब कवठे यांनी पटकाविले व उत्तेजनार्थ 3001 रुपयांचे पारितोषिक गोल्डन स्टार क्रिकेट क्लब शिरवळ यांना मिळाले.
उदयनराजे म्हणाले, युवकांनी खेळाच्या माध्यमातून युक्ती व शक्तीचा वापर करून या स्पर्धात्मक युगात स्वत:ला सिद्ध केले पाहिजे.
अभिषेक यादव म्हणाले, सध्याची पिढी मोबाईल अन् सोशल मीडियाच्या विळख्यात गुरफटत आहे. त्याचबरोबर व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊनच युवकांना मैदानी खेळांमध्ये रस निर्माण व्हावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी ‘किसन वीर’चे संचालक प्रताप यादव यांनी भविष्यातील खासदार म्हणून पुन्हा महाराज साहेबांनी हॅट्रिक करण्यासाठी उदयनराजे यांना शुभेच्छा दिल्या. सुरुर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रकाश सोनावणे यांचा सत्कार व मान्यवरांचा सत्कार खासदार भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.
सुनील काटकर, विकास शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, संतोष मोरे, गुळूंब उपसरपंच सागर जाधव, विजयसिंह पिसाळ, नगरसेवक डोंबळे, आप्पा मालुसरे, विकास गाढवे, चांदक उपसरपंच राजेंद्र खामकर, गुळूंब उपसरपंच सागर जाधव, शिरगावचे उपसरपंच अमर गायकवाड, धोम पुनर्वसन उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)