युको बॅंकेत 621 कोटींचा घोटाळा

सीबीआयकडून माजी अध्यक्ष अरुण कौल यांच्यावर गुन्हा दाखल
नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेतील नीरव मोदीचा कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर युको बॅंकेतही 621 कोटींचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे. याप्रकरणी सीबीआयने युको बॅंकेचे माजी अध्यक्ष अरुण कौल यांच्यासह अन्य जणांविरोधात आज गुन्हा दाखल केला आहे. हा घोटाळा उघडकीस आल्याने देशातील सार्वजनिक बॅंकांना पुन्हा एकदा मोठा धक्‍का बसला आहे.

युको बॅंकेतील 621 कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी सीबीआयने बॅंकेचे माजी अध्यक्ष अरूण कौल यांच्यासह इरा इंजिनअरिंग इन्फ्रा इंडिया लि., कंपनीचे सीएमडी हेमसिंग भराणा, चार्टड अकाऊंटट पंकज जैन आणि वंदना शारदा यांच्यासह अन्य जणांवर गुन्हा नोंदविला आहे.

सीबीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एकत्रितपणे षडयंत्र रचून युको बॅंकेकडून विविध कर्जस्वरूपात 621 कोटी रुपयांची अफरातफर केली आहे. याप्रकरणी सीबीआयने दहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहे. यात दिल्लीसह मुंबईतील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)