युकी भांब्रीची मानांकनात 83व्या स्थानावर झेप

नवी दिल्ली – भारताचा स्टार टेनिसपटू युकी भांब्रीने जागतिक टेनिस मानांकन यादीत पुन्हा एकदा अव्वल शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला असून त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असे 83वे मानांकन मिळवले आहे. तर महिलांमध्ये अंकिता रैना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 194व्या स्थानी पोहोचली आहे. दुहेरीमध्ये रोहन बोपण्णा 19व्या स्थानी आहे.
युकी यापूर्वी फेब्रुवारी 2016 मध्ये मानांकन यादीत पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये होता. परंतु दुखापतीमुळे काही काळ खेळू न शकल्याचा त्याला मानांकनात तोटा झाला होता.

परिणामी तो पहिल्या शंभर खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडला होता. मात्र तैपेई चॅलेंजर स्पर्धेत मिळवलेल्या विजयाने युकीला मानांकन यादीत 22 स्थानांचा फायदा झाला असून त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावले आहे. युकीच्या कामगिरीने 2011 नंतर कोणत्याही भारतीयाने मानांकन यादीत मिळवलेले हे सर्वोत्तम स्थान आहे. 2011 मध्ये सोमदेव देववर्मनने 62 वे स्थान मिळवले होते. युकीने 2015 मध्ये पहिल्यांदा पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर त्याच्या मागे लागलेल्या दुखापतीच्या ग्रहणामुळे त्याला या यादीत आणखी मोठी झेप घेता आली नाही.

त्याचबरोबर भारताच्या रामकुमार रामनाथनला 116 वे मानांकन मिळाले आहे, तर सुमित नागलला दोन स्थानांचा फटका बसला असून तो 215व्या स्थानी घसरला आहे. या दोघांपाठोपाठ भारताचा प्रजनेश गुणेश्‍वरन आणि अर्जुन कढे अनुक्रमे 266 आणि 394 व्या स्थानी आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)