युकी भांब्रीची डेव्हिस लढतीतून माघार

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यात होणाऱ्या डेव्हिस चषक विश्व गट प्ले ऑफ लढतीतून भारताचा टेनिसपटू युकी भांब्रीने शारीरिक समस्येमुळे माघार घेतली आहे. युकीच्या पोटाचा स्नायु दुखावल्याने त्याला वेदना जाणवत आहेत.

भारताच्या निवड समितीने आता युकी भांब्रीच्या जागी प्रज्ञेशचा डेव्हिस चषक संघात समावेश केला आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये झालेल्या डेव्हिस चषक विश्व गट प्ले ऑफ लढतीत भारताला यजमान कॅनडाकडून हार पत्करावी लागली होती. भारत आणि चीन यांच्यातील आशिया ओसेनिया गट-1 दुसऱया फेरीची ही लढत चीनमध्ये 6-9 एप्रिलला होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)