युकी उपान्त्यपूर्व फेरीत, रामकुमार पराभूत 

मियामी – भारताचा गुणवान युवा टेनिसपटू युकी भांब्रीने यंदाच्या मोसमातील आपला फॉर्म कायम राखताना एटीपीव मियामी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या पात्रता फेरीत आगेकूच केली. मात्र भारताचा अन्य उदयोन्मुख खेळाडू रामकुमार रामनाथनचे आव्हान पात्रता फेरीतील पहिल्याच पराभवामुळे संपुष्टात आले.
युकीने गेल्या आठवड्यांत झालेल्या इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मान मिळविला होता. तसेच त्याने विश्‍वक्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या लुकास पोइलेवर सनसनाटी विजयही मिळविला होता. हाच धडाका कायम राखताना युकीने पहिल्या पात्रता फेरीत अर्जेंटिनाच्या रेन्झो ऑलिव्होचा 6-4, 6-1 असा फडशा पाडताना मियामी मास्टर्स स्पर्धेतील अंतिम पात्रता फेरीत धडक मारली.
युकीसमोर आता स्वीडनच्या एलियास वायमेरचे आव्हान आहे. वायमेरला विश्‍वक्रमवारीत 133वे मानांकन असून दोन वेळा फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद मिळविणारा रॉबिन सोडरलिंग त्याचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे युकीसमोर वायमेरबरोबरच सोडरलिंगसारख्या प्रशिक्षकांनाही तोंड देण्याचे आव्हान आहे.
दरम्यान भारताच्या रामकुमार रामनाथनला अमेरिकेच्या मायकेल एममोहविरुद्ध 6-7, 4-6 असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याचे मियामी मास्टर्स स्पर्धेतील आव्हान पात्रता स्पर्धेतील पहिल्या फेरीतच संपुष्टात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)