युएपीए विरोधात कर्नल पुरोहित हायकोर्टात 

एनआयए न्यालयाच्या निर्णयाला आव्हान 

मुंबई: मालेगाव-2008च्या बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीला आता पुन्हा विलंब होण्याची शक्‍यता आहे. हा खटला उच्च न्यायालयाने दररोज नियमित सुनावणी घेऊन निकाली काढा, असा आदेश दिलेला असताना या खटल्यातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या विरोधात युएपीएच्या कलमांतर्गत खटला चालवण्याच्या सत्र न्यायालयाच्या एनआयए न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वाच्च न्यायालयाने 15 एप्रिल 2015 रोजी मालेगाव बॉम्बस्फोट खटला वेगाने चालविण्याचे आदेश दिलेले असताना या खटल्याच्या सुनावणीस विलंब होत असल्याने त्यावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी दिले होते. या खटल्यातील आरोपी विरोधात युएपीएच्या कलमांतर्गत खटला चालविण्याचा निर्णय एनआयए न्यालयाने घेतला.

त्यानुसार 26 ऑगस्ट रोजी आरोप निश्‍चित करण्याचे निश्‍चित केले आहे. परंतू कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर निर्णय होत नाही तोपर्यंत आरोपपत्र निश्‍चित करण्याची प्रकिया पार पाडता येणार नसल्याने या खटल्याला आता आणखी विलंब होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)