नगर – जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवाना धारकांनी नॅशनल डेटाबेस फॉर आर्म लायसन्स प्रणालीमध्ये माहिती भरुन युनिक आयडेंटीफिकेशन नंबर प्राप्त करुन घेणे आवश्‍यक आहे. या डेटाबेसमध्ये शस्त्र परवाना धारकांची माहिती भरणे अनिवार्य असून, त्यामध्ये माहिती न भरल्यास शस्त्र परवाना अवैध ठरविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने शस्त्र परवानाधारकांची माहिती इलेक्‍ट्रॉनिक स्वरुपात तयार करण्यासाठी नॅशनल डेटाबेस फॉर आर्म लायसन्स ही संगणक प्रणाली तयार केली आहे. या संगणक प्रणालीमध्ये सर्व शस्त्र परवाना धारकांची माहिती भरणे आवश्‍यक आहे. विहित नमुन्यातील फार्म सर्व उपविभागीय दंडाधिकारी कार्यालये, सर्व तहसील कार्यालयामध्ये माहिती उलपब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांनी त्यांची आवश्‍यक माहिती विहित नमुन्यातील फॉर्ममध्ये भरुन संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी यापूर्वीच कळविण्यात आले आहे. ज्या शस्त्र परवानाधारकांनी माहिती भरुन दिलेली नाही. त्यांनी दि. 22 मार्चपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात जमा करावी. जे शस्त्र परवाना धारक माहिती भरुन देणार नाहीत त्यांचा शस्त्र परवाना अवैध ठरवून शस्त्र परवान्यावरील शस्त्र तत्काळ पोलीस विभागामार्फत जमा करुन घेण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)