या हिवाळ्यात बाळांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स 

हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, विशेषकरून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण त्याची त्वचा ही मोठ्यांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेला अधिक पोषणाची गरज असते कारण तापमान कमी झाल्याने त्वचा कोरडी पडू लागते.

हिमालया ड्रग कंपनी च्या डिस्कव्हरी सायन्सेस ग्रुपमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुभाषिणी एन. एस. यांनी सांगितले लहान मुलांचे गाल, गुढघे, नाक आणि कोपर हे अवयव हे अधिक कारडे असतात आणि थंडीमध्ये ते अधिक कोरडे होऊ लागतात. आपल्या त्वचेला नैसर्गिक असा एक ओलावा असतो आणि अतिशय कठोर अशी रसायने असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या लहान मुलाच्या त्वचेची काळजी घेत असतांना नैसर्गिक घटक असलेली उत्पादने आपण वापरणे अधिक चांगले.

डॉ. सुभाषिणी यांच्या मते पालकांनी नेहमीच बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, कोरफड, विंटर चेरी, जेष्टमध, मध आणि दुधाने युक्त अशी उत्पादने वापरावीत. या सर्व वनस्पती /घटक हे घरगुती तर असतातच पण त्याच बरोबर यांमुळे त्वचेतील ओलावा त्वचेतच राहतो आणि त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाते.

मुलांना आंघोळ घालण्यापूर्वी तेलाने मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा अधिक चांगली मऊ राहण्यास मदत मिळते. हिवाळ्यात दोन दिवसांतून एकदा लहान मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालणे हितकारक असते. जर पाणी खूपच गरम असेल तर त्यामुळे त्वचेवरील संरक्षक स्तराला इजा होण्याची शक्‍यता असते. त्याचबरोबर लहान बाळाला अधिक काळ आंघोळ घातली तर त्यामुळे त्वचेतील ओलावाही निघून जाण्याची शक्‍यता असते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळीचा कालावधी कमी करावा.

आंघोळ झाल्यावर त्वचेची निगा राखण्यासाठी तसेच आतील ओलावा आतच ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. कंट्री मॅलो (बला) आणि लिकोराईस (जेष्ट्‌यमध) यांनी युक्त अशा बेबी क्रीमचा उपयोग केल्यास तुमच्या बाळाच्या त्वचेला ओलावा मिळण्या बरोबरच रक्षणही होते विशेषकरून गाल, गुडघे, नाक आणि घासली जाणारी कोपरे यांचेही रक्षण होते.

लहान मुलांना उबदार ठेवण्यासाठी चांगले उबदार कपडे वापरावेत. मुलांना थेट लोकरी स्वेटर्स किंवा ब्लॅंकेट्‌स मध्ये गुंडाळू नये कारण हे कपडे रखरखीत असतात त्यामुळे काही बाळांच्या संवेदनशील त्वचेला त्रास होऊन रॅशेस येऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)