‘या’ सोशल मीडिया अॅपवर रशियन न्यायालयाने घातली बंदी

मॉस्को : टेलिग्राम या मेसेंजर अॅपवर रशियन न्यायालयाने बंदी घातली आहे. रशियन सरकारने दाखल केलेल्या एका याचिकेनुसार रशियन न्यायालयाने हा निर्णय घेतला असून संपुर्ण रशियामध्ये या अॅप बंदी घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे टेलिग्राम ही मूळ रशियन कंपनी असून देखील रशियाने यावर बंदी घातल्यामुळे अनेक जणांकडून यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टेलिग्राम हे अॅप रशियामध्ये मोठ्या संख्येत वापरले जाते. त्यामुळे याद्वारे दररोज अनेक महत्त्वाचे संदेश पाठवले जातात. त्यामुळे रशिया सरकारने टेलिग्रामला आपल्या अॅपमधून देवाणघेवाण होणाऱ्या संदेशांची चौकशी करण्याचे अधिकार मागितले होते. देशात कधीही दहशतवाद अथवा तत्सम देशविघातक घटना घडल्यास त्यांचा शोध घेण्यास त्याची मदत व्हावी. परंतु टेलिग्रामचे संस्थापक अध्यक्ष पावेल दुरोव यांनी हे कंपनीच्या नियमांच्या बाहेर असल्याचे म्हटले. तसेच ग्राहकांच्या गोपनीयतेचा दाखला देत हा अधिकार देण्यास नकार दिला. त्यामुळे रशिया सरकारने याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करत आपले गाऱ्हाणे मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)