या विजेतेपदामुळे “त्यांची’ तोंडे बंद होतील – सिंधू

File photo

गुआंगझोऊ: भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने प्रतिष्ठेचे वर्ल्ड टूर फायनल्सचे विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. अशी कामगिरी करणारी सिंधू ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजेतेपदानंतर बोलताना तिने सांगितले की, या विजयानंतर कोणी माझ्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थीत करणार नाहीत. मी मोक्‍याच्यावेळी दडपणाखाली येऊन अंतिम सामने गमावते, असे बोलणारे आता गप्प होतील.

पुढे बोलताना तिने सांगितली की, या ऐतिहासिक विजयामुळे मी खूप खुश आहे. या वर्षात काही अंतिम सामन्यात प्रवेश करूनही मला विजेतेपद मिळवता आले नव्हते. वर्षतील हे माझे पहिले विजेतेपद असल्याने नेहमी स्मरणात राहील. मला आशा आहे की आता मला कोणी विचारणार नाही की, तू अंतिम सामन्यात येऊन कसे पराभूत होतेस? असेही सिंधू यावेळी म्हणाली. चालू वर्षात सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत स्थान पक्के केले होते परंतु अंतिम सामना जिंकण्यात तिला अपयश आले होते.
सिंधूचे आणि भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पी. गोपीचंद यांना देखील हे विजेतेपद खूप महत्वाचे वाटते. याबाबत बोलताना ते म्हणाले, सिद्धू मोठ्या स्पर्धांचे अंतिम सामने सतत होती. तिच्या विजयाची प्रतीेक्षा सर्वांना होती. खासकरून तिच्यावर या गोष्टीचे अधिक मानसिक दडपण होते. वर्षाची शेवटची स्पर्धा वर्ल्ड टूर जिंकल्याने तिच्यावरील दडपण कमी होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपल्या पुढील वेळापत्रकाबाबत सांगताना सिंधू म्हणाली, मी या स्पर्धेत सर्व सामने जिंकले आणि अंतिम सामनादेखील जिंकले आहे. त्यामुळे मी विजयी लयीत आहे. आंतररष्ट्रीय स्पर्धा संपल्याने मी आता इंडियन लीगमध्ये( प्रीमियर बॅडमिंटन लीग)सहभागी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)