‘या’ भारतीय खेळाडूने नर्सला शिकवले ‘बाबाजी का ठुल्लू’ सेलिब्रेशन

वेस्ट इंडिजचा संघ भारतीय दौऱ्यावर आल्यापासूनच बलाढ्य भारतीय संघासमोर दुबळ्या आणि नवख्या विंडीज संघाचा काय निभाव लागणार? अशा चर्चा भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये रंगल्या होत्या. अपेक्षेप्रमाणेच भारतीय संघाने २ कसोटींच्या मालिकेत विंडीजला निस्तेनाबूत केले. यानंतर होऊ ठाकलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये देखील भारत विंडीजला कसोटी मालिकेप्रमाणेच पाणी पाजेल अशी भविष्यवाणी क्रिकेट ‘पंडितांकडून’ वर्तवण्यात आली होती. मात्र क्रिकेट हा ‘अनिश्चिततांचा’ खेळ असल्याचीच अनुभूती भारतीय क्रिकेट रसिक एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून घेत आहेत.

असो काल भारत आणि वेस्टइंडीज यांच्या दरम्यान रंगलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवणाऱ्या अॅशले नर्सचे ‘बाबाजी का ठुल्लू’ स्टाईल सेलिब्रेशन आठवतंय ना? १७व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नर्सने डावखुऱ्या शिखर धवनचा बळी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील पहिले ‘बाबाजी का ठुल्लू’ स्टाईल सेलिब्रेशन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅशले नर्सला नंतर सामनावीराचा किताब देण्यात येत असताना त्याच्या युनिक ‘बाबाजी का ठुल्लू’ स्टाईल सेलिब्रेशन बाबत विचारले असता त्याने आपल्याला हि स्टाईल भारतीय क्रिकेटर सनी सोहेल याने ‘सीपीएल’ क्रिकेट लीग दरम्यान शिकवल्याचे त्याने सांगितले. सनीने आपल्याला बळी घेतल्यानंतर ‘बाबाजी का ठुल्लू’ कर असा सल्ला दिल्याचे देखील तो सांगतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)