‘या’ पाकिस्तानी खेळाडूने उपचारासाठी भारताला केली विनंती !

नवी दिल्ली: पाकिस्तानचा दिग्गज माजी हॉकीपटू सध्या हृदयरोगाने त्रस्त आहे. त्यामुळे मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे विनंती केली असल्याचे सांगण्यात येत आहे. हॉकी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मन्सूर अहमद यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचं आहे. त्यासाठी त्यांनी भारत सरकारकडून व्हिजा मिळावा अशी विनंती एका व्हिडीओद्वारे केली आहे.

सुषमा स्वराज यांनी मेडिकल व्हिजा द्यावा, अशी विनंती मन्सूर अहमद यांनी केली आहे. अत्यंत भावूक होऊन मन्सूर अली यांनी व्हिडीओ जारी केला आहे.

“भारताविरुद्धच्या हॉकी सामन्यात मी अनेकवेळा भारतीयांची मनं दुखावली. अनेकवेळा मी भारताचा विजय हिसकावून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मात्र तो खेळाचा भाग होता. आता मला माझ्या हृदयशस्त्रक्रियेसाठी भारत सरकारची मदत हवी आहे. भारत सरकारचा ‘मेडिकल व्हिजा’ माझं आयुष्य वाचवू शकेल. मानवताच सर्वश्रेष्ठ आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध ताणलेले आहेत. मात्र खेळाने ही दरी अनेकवेळा दूर केली आहे. यावेळीही होईल” असे मन्सूर अहमद यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)