‘या’ देशात प्राण्यांचे पोट भरण्यासाठी जातोय प्राण्यांचाच बळी

व्हेनेझुएला : प्रचंड तुटवडा असल्याने अन्न मिळवण्यासाठी झगडणाऱ्या व्हेनेझुएला येथील नागरिकांना स्वतःचे पोट भरणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी देश सोडला आहे. या देशातील प्राणीसंग्रहायालयात देखील भीषण परिस्थिती आहे.

मोठ्या प्राण्यांच्या अन्नाची गरज भागवण्यासाठी संग्रहालयातीलच बदक, डुक्‍कर, शेळी यांसारख्या प्राण्यांचा बळी दिला जात आहे, अशी माहिती प्राण्यांच्या हक्‍कासाठी काम करणाऱ्या संस्‍थांनी दिली आहे.

झुलिया प्राणी संग्रहालयातील काही दुर्मिळ प्राण्यांचे फोटो प्रकाशित झाले आहेत. ज्‍यामध्ये त्यांचे कुपोषण झाल्‍याचे समोर आले आहे. यामध्ये वाघ, सिंह आणि हत्ती यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)