‘या’ देशात पहिल्यांदाच रंगणार फॅशन शो जलवा

रियाध : सौदी अरेबिया देशात पहिल्यांदाच फॅशन शो रंगणार आहे. सौदीतला पहिला वहिला फॅशन शो दुबईच्या आलिशान हॉटेलमध्ये पार पडणार असल्यामुळे येथील महिलाही या शोबाबत खूप उत्सुक आहे. पण या शोसाठी काही कडक नियमही घालण्यात आले आहेत. पूर्णपणे हा फॅशन शो महिलांसाठी असल्याने येथे फक्त महिलांनाचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रॅम्पवरही महिला मॉडेलच रॅम्पवॉक करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचबरोबर फॅशन शोच्या दरम्यान छायाचित्रिकरणावरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

देशात फॅशन शो होणार याच्या गेल्याकाही दिवसांपासून चर्चा होत्या. पण दोनदा हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलला गेला. आता अखेर या शोची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून जगभरातील मोठे तसेच स्थानिक फॅशन ब्रँड आपले कलेक्शन रॅम्पवर उतरवणार आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)