या देशाच्या अध्यक्षाने मेकअपवर उडविले 3 महिन्यांत 30 हजार डॉलर

पॅरिस – फ्रान्सचे तरुण अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी त्यांची चर्चा त्यांच्या मेकअपमुळे होत आहे. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर केवळ 3 महिन्यांत मॅक्रॉन यांनी तब्बल 30 हजार डॉलर उडविले म्हणून त्यांच्यावर तुफान टीका होत आहे.

एका फ्रेंच संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या 39 वर्षांचे असलेले अध्यक्ष मॅक्रान यांनी गेल्या 3 महिन्यांत 30 हजार डॉलर म्हणजेच 19 लाख 16 हजार रुपये खर्च केले आहेत, असे या संकेतस्थळाने म्हटले आहे. अध्यक्षांच्या कार्यालयानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र हा खर्च कमी करण्यात येईल, असेही कार्यालयाने म्हटले आहे.

अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या इलिसी पॅलेसने मेकअप आर्टिस्ट नताशा एम यांना दोन हप्त्यांमध्ये ही रक्कम दिली. पहिल्या हप्त्यात 10 हजार यूरो म्हणजेच 7 लाख 62 हजार आणि दुसऱ्या वेळेस 16 हजार यूरो म्हणजेच 12 लाख 19 हजार रुपये दिले होते, असे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)