‘या’ तारखेला २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण

नवी दिल्ली : आजपासून बरोबर एक महिन्याने म्हणजेच २७ जुलै रोजी २१ व्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण दिसणार आहे. हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्राचे असेल असेल म्हटले जात आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी १ तास ३४ मिनिटांचा असेल. या काळात चंद्र अतिशय सुंदर अशा लालसर रंगात दिसेल.

वैज्ञानिकांनी या चंद्रग्रहणाला ब्लड मून (Blood Moon) असे नाव दिले आहे. हे ग्रहण भारताबरोबरच आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियामध्ये दिसणार आहे. चंद्रग्रहण हे सूर्यग्रहणाप्रमाणे डोळ्य़ांना हानीकारक नसते, त्यामुळे ते उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान,चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असते तेव्हा चंद्र जास्त प्रमाणात चमकतो, त्याला सुपरमून म्हणतात. ब्लड मूनमध्ये चंद्रग्रहणादरम्यान चंद्र लाल रंगाचा दिसतो. पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान चंद्र जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतो तेव्हा त्याच्यावर लाल रंगाची सावली पडते आणि तो लाल दिसतो. यालाच आपण ब्लड मून म्हणतो. असे तेव्हाच होते जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत झाकला जातो. यातही सूर्याची लाल किरणे चंद्रापर्यंत पोहोचतात.

जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे पौर्णिमेच्या आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही. सुर्यप्रकाशामुळे पडणारी पृथ्वीची सावली प्रछाया व उपछाया अशी दोन प्रकारची असते. प्रछाया सावलीच्या मध्यभागी व उपछाया प्रछायेच्या भोवती असते. प्रछायेत सुर्यकिरणे अजिबात नसतात. उपछायेत मात्र सुर्यकिरण सुर्याच्या एका भागातून येतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)