या’ छोट्याशा देशाने केली अमेरिकेची कानउघाडणी

न्यूयॉर्क : ‘अमेरिका स्वतःला जगातील सर्वात शक्तीशाली देश समजत आहे. पण, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा मान राखावा व स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजू नये, अशा शब्दात बोलिव्हिया या छोट्याशा देशाने अमेरिकेची कानउघडणी केली आहे.

बोलिव्हियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत साचा लोरेंटी यांनी अमेरिकेची कानउघडणी केली असून अमेरिकेने सिरीयावर हल्ला करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.

रशियातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अमेरिका स्वतःला सर्वात शक्तिशाली देश समजत आहे, अशी टीका केली. तसेच अमेरिकाने हे ध्यानात घ्यायला हवे कि, सिरीया संबंधी संयुक्त राष्ट्रांनी मिळून काही नियम आणि कायदे तयार केले आहेत. त्यामुळे सिरीयावर हल्ला करणे म्हणजे एक प्रकारे संपूर्ण संयुक्त राष्ट्रांच्या मर्यादांचे आणि कायद्यांचे उलंघन करण्यासारखे आहे, असे लोरेंटी यांनी म्हटले. याचबरोबर अमेरिकेने सिरीययावर हल्ला करण्याची आपली योजना मागे घ्यावी, असे त्यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)