या चौकीदाराने राखणदारी केलेली आहे…

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 85 मिनिटांत सहा विकासकार्यांचा शुभारंभ करणार आहेत. सकाळी 10 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास मोदी यांचे हेलिकॉप्टरने बिदरहून सोलापूर विमानतळावर आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचं पगडी घालून स्वागत केले. यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे मराठी भाषेतून भाषणाची सुरुवात केली आहे. सोलापूरकरांनी आशीर्वाद दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी सोलापुरकरांचे आभार मानले आहेत.

मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

-या चौकीदारानं राखणदारी केलेली आहे
-विठ्ठल रुक्मिणीला मोदींचं नमन
-आम्ही गाजावाज न करता गरीबांच्या खात्यात तीन हजार कोटी रुपये पोहोचवलेत.
– पूर्वी दलाल हे सगळा पैसा खात असत आ़ज ही सगळी दलाली बंद झालेली आहे
– 2004 ते 2014 दिल्लीत रिमोट कंट्रोलवर चालणारं सरकार होतं – मोदींचा कॉंग्रेसवर हल्ला
– केवळ भूमीपूजन करायचे आणि मागे वळूनही पहायचे नाही ही आमची संस्कृती नाही
– भूमीपूजन आम्ही केलंय घरांच्या चाव्या देण्यासाठीही आम्हीच येणार 
– देशाच्या पूर्व भागातला विकास खुंटला तो यापूर्वीच्या राज्यकर्त्यांमुळे
– आपली शहर आर्थिक उलाढालींचीं केंद्र
– भाजप जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटीबद्ध
– आम्ही दिखाव्यासाठी काम करत नाही
– लाखो कुटुंबांना आरक्षणाचा लाभ
– काही लोकांना राजकारणाशिवाय बाकी काही सुचत नाही
– या लोकांकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाची खिल्ली उडवली गेली
– आमचं सरकार एका नवीन विचारासह काम करत आहे
– आम्ही एकट्या सोलापुरात तीस हजार घरं बांधली
– आम्ही केवळ गरीबांचाच नाही तर मध्यमवर्गाचाही विचार करतो

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)