‘या’ चित्रपटातून दिसणार कादर खान यांची शेवटची झलक 

ज्येष्ठ अभिनेते आणि संवाद लेखक कादर खान यांचे आज गंभीर आजाराने निधन झाले. ४३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांतून प्रेक्षकांना खळखळून हसविण्याचे काम केले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह चाहत्या वर्गावर दुःखाची लाट पसरली आहे. तरीही कादर खान प्रेक्षकांना पुन्हा एकदा हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हेरा-फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कादर खान यांची झलक पाहायला मिळणार आहे.

नीरज वोरा आणि अहमद खान दिग्दर्शित ‘हेरा-फेरी ३’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात बाबूराव गणपतराव आपटे (परेश रावल) यांची कॉमिक टायमिंग दिसणार आहे तर दुसरीकडे कादर खान यांच्या अभिनयाचा तडका लागणार आहे. ‘हेरा-फेरी ३’ जुलै २०१९ रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चित्रपटात परेश रावल, सुनील शेट्टीसह जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनही झळकणार आहेत. परंतु, यामध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याने प्रेक्षक राजूच्या भूमिकेला नक्कीच मिस करणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)