‘या’ क्षेत्रात वाढणार रोजगाराच्या संधी

बॅंक, विमा क्षेत्रात रोजगार वाढणार

चार वर्षात तब्बल 9 लाख रोजगार निर्माण होणार?

नवी दिल्ली: बॅंकिंग, वित्त, सेवा व विमा क्षेत्रामध्ये म्हणजे बीएफएसआयमध्ये पुढील 4 वर्षांमध्ये सुमारे 9 लाख रोजगार निर्माण केले जातील, असे टीमलीज सर्विसेसच्या अहवालात म्हटले आहे.

9 शहरांमधील 17 क्षेत्रांचे विश्‍लेषण अहवालात केले गेले आहे. वित्तीय क्षेत्रामध्ये तांत्रिक प्रगतीचा थेट परिणाम म्हणून ही रोजगार निर्मिती होईल, कारण नवीन कौशल्य असलेल्या व्यक्तींची गरज भासेल. या क्षेत्रात रोबोट प्रोग्रामर्स, ब्लॉकचेन आर्किटेक्‍टस, प्रोसेस मॉडेलर एक्‍स्पर्टस, डेटा वैज्ञानिक व क्‍लाएंट सहभाग व्यवस्थापक असे राजगार निर्माण होणार आहेत.
बीएफएसआय आणि सरकारी व्हर्टिकल असलेल्या टीमलीज सर्विसेसचे प्रमुख अमित वडेरा म्हणाले की, ऑटोमेशनच्या प्रक्रियेमुळे बॅंकिंग क्षेत्राच्या कामांमध्ये क्रांती घडून आली आहे. सरकारी व खाजगी घटकांच्या गुंतवणुकांमुळे या क्षेत्रात नवीन रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. बॅंक रिकॅपिटलायजेशन योजनेमुळे भारतातील पतपुरवठा वाढ 15% इतका होण्याची अपेक्षा आहे व त्यामुळे आर्थिक वर्ष 2018- 19 मध्ये जीडीपी वाढण्याची अपेक्षा आहे व येणाऱ्या महिन्यांमध्ये अतिरिक्त रोजगार निर्माण होतील.

या उद्योगामध्ये वेतनाच्या संदर्भात दोन आकडी वाढ झाली आहे व सर्वाधिक वाढ बंगलोर येथे 12.63% व त्यानंतर दिल्ली येथे 12.26% इतकी झाली आहे. सरकारी उपक्रमांचाही ह्या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल.
सुधारणांद्वारे पीएसयू बॅंकांना मजबुती देण्यासाठीच्या दोन वर्षीय योजनेमुळे उद्योगाला चालना मिळेल व अधिक रोजगार संधी निर्माण होतील. तसेच, 2018- 19 च्या अर्थसंकल्पानुसार, मुद्रा योजनेमुळे व एमएसएमईना निधीमुळे ह्या क्षेत्राचा कायापालट होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)