‘या’ कारणासाठी अबू सालेमला हवी ४५ दिवसांची सुट्टी

मुंबई : कुख्यात डॉन अबू सालेमने तळोजा तुरुंग प्रशासनाकडे सुट्टीचा अर्ज केला आहे. मला लग्न करायचे आहे त्यामुळे ४५ दिवस सुट्टी मिळावी असे अबू सालेमने अर्जात म्हटले आहे. कौसर बहार या त्याच्या नव्या प्रेयसीशी तो लग्न करणार आहे अशी माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

१९९३ च्या स्फोट प्रकरणातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नवी मुंबईतील तळोजा या ठिकाणी असलेल्या तुरुंगात तो शिक्षा भोगतो आहे. मोनिका बेदी या अभिनेत्रीसोबत असलेले त्याचे प्रेमसंबंधही जगाने जवळून पाहिले आहेत. मात्र अटक झाल्यानंतर आपण अबू सालेमला कधीही भेटलो नाही असे मोनिकाने सांगितले. मोनिका बेदीसोबतचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्यावर आता अबू सालेमच्या आयुष्यात कौसर बहार नावाची २७ वर्षांची तरुणी आली. तिच्याशी निकाह करायचा असल्याने अबू सालेमने ४५ दिवसांच्या रजेचा अर्ज केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)