या ‘एका’ कारणामुळे विंडीज विरुद्धच्या मालिकेसाठी केदार जाधवची नाही झाली निवड ! 

File photo...

भारतीय खेळाडूंच्या निवडीवरून वाद होणे हे सध्या काही नवीन राहिले नाही.  मुरली विजय, हरभजन सिंग यांसारखे खेळाडू निवड समितीवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता केदार जाधवच्या चाहत्यांनी देखील त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत केदारला का स्थान दिले गेलॆ नाही याची अनेक माध्यमांच्या आधारे विचारणा केली आहे.

नुकत्याच झालेल्या आशिया कपच्या  एका सामन्यात केदार जाधवने भारताला विजय मिळवुन देण्यात यशस्वी झाला होता. परंतु, त्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे  पुढील सामन्यांना मुकावे लागले होते. त्यानंतर त्याने  तंदुरुस्तीवर काम केले आणि त्यांचे देवधर करंडकासाठी ‘भारत  अ’ संघात निवड झाली. त्यात त्याने ३५ चेंडूत ४१ धाव पटकाविल्या आणि गोलंदाजी देखील केली. परंतु, त्यानंतर त्याची  वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे प्रसार माध्यमे आणि केदार  जाधव याबाबत विचारणा करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केदारला न निवडण्या मागील गूढ उलघडले आहे. त्यांनी सांगितले की, “केदार जाधव जाधवच्या तंदुरुस्तीचा इतिहास पाहता आम्ही त्याला संघात निवडले नाही. तो तंदुरुस्त होऊन संघात परतला के लगेच त्याच्या तंदुरुस्तीचे समस्या नव्याने पुढे येते. आम्ही पाहणार आहोत की जर ‘भारत अ’ संघ ही जिंकला तर त्यात त्याची तंदुरुस्ती कशी राहते. ”

याबाबत केदारला विचारले असता तो म्हणाला, मला देखील हे तुमच्याकडून (पत्रकार)  समजते आहे. मला नाही माहिती माझी का निवड झाली नाही. त्यांचा विचार काय आहे. परंतु, मी आता रणजी सामने खेळेन.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)