या आहेत बाजार हलविणाऱ्या कॅण्डलस्टिक !

मागील लेखात आपण टेक्‍निकल ऍनालिसिस म्हणजे काय व आलेखाचे प्रमुख प्रकार कोणते ते पाहिलं. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत ते म्हणजे सर्वांत प्रचलित अशा कॅण्डलस्टिक आलेखातील कॅण्डलस्टिकचे विविध प्रकार. आता यांत देखील दोन प्रमुख प्रकार आहेत, तेजी दर्शवणारे कॅण्डलस्टिक्‍स प्रकार व मंदी दर्शवणारे कॅण्डलस्टिक्‍स प्रकार. ही गोष्ट लाल व हिरवी कॅण्डल असणं यापेक्षा वेगळी आहे हे इथं लक्षात ठेवू.

जर त्या कॅण्डलचा बंद भाव हा उघडत्या भावापेक्षा जास्त असेल तर ती कॅण्डल आलेखावर हिरव्या किंवा पांढऱ्या(पारदर्शक) रंगात दर्शवली जाते व त्यास तेजीची अथवा bullish कॅण्डल असं संबोधलं जातं.याउलट जर एखाद्या कॅण्डलचा बंद भाव हा त्याच्या उघडत्या भावापेक्षा कमी असेल तर अशी कॅण्डल आलेखावर लाल अथवा काळ्यारंगात दर्शवली जाते व त्यास मंदीची किंवा bearish कॅण्डल असं संबोधलं जातं.

टेक्‍निकल अनालिसिसमध्ये कॅण्डलस्टिकचे अनेक प्रकार आहेत परंतु प्रमुख प्रकारच येथे विचारात घेत आहे.

1.बुलीश एंगल्फिंग (Bullish Engulfing)- या प्रकारात एखादी कॅण्डल ही र्लीश्रश्रळीह असून त्या कॅण्डलची मुख्य बॉडी त्याच्या मागील कॅण्डलला व्यापून टाकते. याचा अर्थ मागील कॅण्डलपेक्षा या कॅण्डलमधे (खुलता भाव व बंद भाव यांदरम्यान) जास्त हालचाल होवून ती बंद होताना मागील कॅण्डल पेक्षा वरील बाजूस म्हणजेच मागील कॅण्डलच्या भावापेक्षा अधिक भावांनं बंद झालेली आहे.

2.बेअरिश एंगल्फिंग (Bearish Engulfing)- अगदी वरील प्रकारच्या उलट अशी ही कॅण्डल असते फक्त यात आधीची कॅण्डल ही तेजेची असून नंतरची कॅण्डल ही मंदीची असते व मंदीच्या कॅण्डलची व्याप्ती ही मागील तेजीच्या कॅण्डलच्या बॉडीपेक्षा जास्त असते.

3.बुलीश हरामी (Bullish Harami) – ही कॅण्डल दिसण्यात अगदी बुलीश एंगल्फिंग च्या विरुद्ध असते म्हणजे, मागील कॅण्डलच्या मुख्य बॉडीपेक्षा या कॅण्डलची बॉडी थोडी लहान असते, परंतुया कॅण्डलचा खुलता भाव हा मागील कॅण्डलच्या बंद भावापेक्षा वर(अधिक) असतो. याचा अर्थ मागील कॅण्डलच्या बंद भावापेक्षा याचा खुलता भाव वरील बाजूस आहे, म्हणजे तात्पुरता उतरता कल थांबलाय.

4.बेअरिश हरामी (Bearish Harami) – या प्रकारात मागील कॅण्डल ही बुलीश मोठी कॅण्डल असून ही कॅण्डल त्यानंतरची छोटी बॉडी असलेली बेअरिश कॅण्डल असते.

5.हॅमर (Hammer) – याप्रकारात या कॅण्डलचं स्वरूप अगदी हॅमर म्हणजे हातोडीसारखं असतं. म्हणजे मुख्य बॉडी छोटी वपाय (leg)किंवा शॅडो मोठा असते. याचा अर्थ ही कॅण्डलभाव उघडल्यानंतर बरीच खाली येऊन खरेदीच्या आधारामुळं खाली न टिकता, पुन्हा जेथे उघडली होती, त्या आसपास बंद झालीय. ही कॅण्डल ढोबळमानानं कलबदल (ट्रेंड रिव्हर्सल) दाखवते. हॅमर ही बुलीश कॅण्डल असून सर्वसाधारणपणे त्याचे महत्त्व उतरत्या कलात आल्यास वाढते कारण उतरत्या कलात भाव खाली जाऊन बंद होताना पुन्हा भाव खुलत्या भावाच्या वर बंद होत आहे. यातच जर ही कॅण्डल लाल असेल तर त्यास हॅंगिंग मॅन म्हणतात.

6.उलटी (inverted) हॅमर – यामध्ये हॅमरचं डोकं (मुख्य छोटी बॉडी) खाली तर पाय वरती असतो. वरील प्रकारच्या बरोबर उलट याचा अर्थ लावू शकतो म्हणजे, भाव उघडल्यानंतर भाव वरती गेला पण विक्रीचा दबाव आल्यानं पुन्हा बंद होताना खुलत्या भावाच्या आसपास बंद झाला. हा देखील कलबदलाचाच नमुना आहे. साधारणपणे, याचं महत्त्व चढत्या कलाच्या (Up down) शेवटी आल्यास वाढतं.

7.दोजी (Doji) – या प्रकारात देखील मुख्य बॉडी ही अगदी बारीक असून पाय हे त्या प्रमाणात मोठे असतात. ही कॅण्डल ही कोणताच निष्कर्ष काढू देत नाही, त्यामुळं नेहमी यानंतरच्या कॅण्डलला महत्त्व दिलं जातं.

8.पिअर्सिंग (Piercing) – हा देखील एक कलबदल दर्शकनमुना ठरू शकतो. या प्रकारात मुख्य बॉडी ही मोठी हवी. बुलीश पिअर्सिंग या प्रकारात चालू कॅण्डलचा बंद भावहा मागील बेअरिश कॅण्डलच्या मुख्य बॉडीच्या निम्म्याहून अधिक पाहिजे.

9.मॉर्निंग स्टार – या प्रकारात छोटीबॉडी असलेली कॅण्डल हीएका मोठ्या लाल कॅण्डलनंतरआल्यासव त्यानंतर पुन्हा हिरवी (तेजी) कॅण्डल आल्यास हा कलबदल असू शकतो.

10.इव्हनिंग स्टार- मॉर्निंग स्टारच्या बरोबर उलटा प्रकार म्हणजे इव्हनिंग स्टार. याचा अर्थ आपण पुढील अवधीत भावात घसरू शकतात असं अनुमान काढू शकतो.

11.स्पिनिंगटॉप्स – या प्रकारात देखील कॅण्डलस्टिकची मुख्य बॉडी ही छोटी असते परंतु दोजी प्रकारापेक्षा थोडी मोठी असते व पाय हे देखील फार मोठे नसतात. हा प्रकार प्रामुख्यानं एका कलाच्या शेवटास पहावयास मिळतो.

या मुख्य प्रकारांव्यतिरिक्त थोड्या-फार फरकानं विविध प्रकार पाहायला मिळतात. आता पुढील लेखात आलेखाचे प्रकार व त्यावरून प्रत्यक्षात बाजाराचे अनुमान कसं काढता येऊ शकतं, ते पाहुयात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)