‘या’ आमदारांचा भाजपाला पाठिंबा मिळणार ?

बंगळूरू : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी सत्ता स्थापन करण्याचं निमंत्रण देताच आज सकाळी भाजपाचे विधीमंडळातील नेते येडीयुरप्पा यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे आता आमदारांची जुळवाजुळव करण्याचे जोरदार प्रयत्न भाजपाकडून सुरू झाले आहेत.

काँग्रेस आणि जेडीएसच्या लिंगायत आमदारांकडे भाजपाचं विशेष लक्ष आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या युतीमुळे दोन्ही पक्षांमधील लिंगायत समाजाचे आमदार नाराज आहेत. याच फायदा घेत या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत.

मुख्यमंत्री येडियुरप्पा लिंगायत समाजाचे राज्यातील मोठे नेते मानले जातात. त्यामुळे कुमारस्वामी यांच्या नेतृत्त्वावर नाराज असलेले काँग्रेस आणि जेडीएसमधील जवळभर डझनभर आमदार भाजपाला पाठिंबा देऊ शकतात. भाजपाचे 104 आमदार असल्यानं त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 8 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. काँग्रेस, जेडीएसच्या नाराज आमदारांचं समर्थन मिळवण्यात भाजपा यशस्वी झाल्यास त्यांना बहुमत सिद्ध करण्यात यश येऊ शकतं. असं घडल्यास भाजपासाठी ते मोठं यश असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)