या आठवड्यात पाच दिवस बँका राहणार नाहीत बंद

मुंबई: या आठवड्यात बँकांना गुरुवारपासून सलग पाच दिवस सुट्टी असल्याचा मेसेज सोशल मीडिावर फिरत आहे. त्यामुळे बँकांच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. मात्र बँकांच्या सलग सुट्ट्यांबाबत बँक प्रशासनाकडून स्पष्टीकरण समोर आले आहे. त्यानुसार बँकांना या आठवड्यात सलग पाच दिवस नव्हे तर केवळ गुरुवारी आणि शुक्रवारी बँका बंद राहणार आहेत. तर ३१ मार्च रोजी पाचवा शनिवार असल्याने बँका सुरू राहतील.

बँक प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या परिपत्रकानुसार बँकांना फक्त गुरुवारी २९ मार्च रोजी महावीर जयंतीची आणि शुक्रवारी ३० मार्च रोजी गुड फ्रायडेची सुट्टी असेल. शनिवारी बँकेचे कामकाज सुरू राहील. त्यानंतर सोमवार पासून नियमित कामकाज सुरू होईल. या आठवड्यात 5 दिवस सुट्टी असणार नाही, असे बँकांच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सीबीएस प्रणालीमुळे वर्षअखेरीस बँकांचे काम सोपे झाले आहे. ते शनिवारी सायंकाळी किंवा रविवारी केले जाणार आहे.

मार्च अखेरीस आर्थिक वर्षाचा लेखाजोखा, मांडताना, सगळे हिशेब जुळवताना बँकांची  पार तारांबळ उडते. बँक कर्मचारी सध्या त्याच कामात व्यग्र आहेत. त्यात यंदा जीएसटीमुळे त्यांच्यावर अधिकच भार पडत आहे. या पार्श्वभूमीवर 29 मार्चला महावीर जयंती, 30 मार्चला गुड फ्रायडे, 31 मार्चला इअर एन्डिंग आणि 1 एप्रिलला रविवार अशी सलग चार दिवस आणि दोन एप्रिलला देशातील काही राज्यांमध्ये अशी एकूण पाच दिवस बँकांना सुट्टी असल्याचे मेसेज सोशल मीडियावर पसरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup: Thumbs up
15 :heart: Love
2 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)