झोया अख्तरच्या आगामी ‘गल्ली बॉईज’ या सिनेमाच्या शूटिंगकरिता मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्टेशनवर बॉलिवूडचे तारे अवतरले होते. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह या सिनेमाच्या शूटिंगसाठी चक्क मुंबईतील गोरेगाव स्टेशनवर अवतरले होते. लाल रंगाचा टी-शर्ट, जीन्स, उन्हापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोक्याभोवती गुंडाळलेला स्कार्फ, हातात मोबाईल आणि बॅग अशा अवतारात आलिया एकदम मुंबईकर कॉलेज तरुणी वाटत होती.

नेहमी लोकल पकडण्यासाठी धावणा-या मुंबईकरांनीही गर्दीत आलियाला ओळखलं नाही. सर्वसामान्य मुंबईकर तरुणीप्रमाणे गोरेगावच्या प्लॅटफॉर्म क्र.३ वर आलिया लोकलची वाट पाहत असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंह चॉकलेटी टी शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्स या अंदाजात गोरेगावच्या पूलावर दिसून आला. आलिया आणि रणवीर यांचा हा अंदाज इतका साधा होता की कुणीही त्यांना ओळखू शकलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)