यासिन मलिक स्थानबद्ध…

श्रीनगर – जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख मोहंमद यासिन मलिक याला आज पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. जामीया मशिदीच्या परिसरात आयोजित करण्यात करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी मलिक तिकडे जात होता. त्यावेळी खनयार येथे त्याला स्थानबद्ध करण्यात आले. त्याला कोठीबाग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. विद्यार्थी आंदोलकांच्या विरोधात सशस्त्र दलांचा वापर केल्याच्या विरोधात हे आंदोलन केले गेले.

एनआयएकडून लोकांची सर्रास धरपकड सुरू आहे त्याच्याही विरोधात ही आंदोलने सध्या काश्‍मीर खोऱ्यात सुरू आहेत. जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रंटच्या प्रवक्‍त्याने संगितले की यासिन मलिक याचे वाहन पोलिसांनी खनयार भागात गौसिया हॉस्पीटल जवळ अडवले. आणि त्याला गाडीतून खेचून पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आले. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी मलिक याच्याशी गैरवर्तन केले असा आरोपही त्यांनी केला आहे. या पोलिस कारवाईचा हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते उमर फारूख यांनी निषेध केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)