यार्डी सॉफ्टवेअर संघाची डॉइश्‍च बॅंकेवर मात

प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे: गौतम तुळपुळेच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर यार्डी सॉफ्टवेअर संघाने डॉइश्‍च बॅंक संघावर आठ गडी राखून मात करताना येथे सुरु असलेल्या प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.
पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या मैदानावर ही लढत झाली. यार्डी सॉफ्टवेअर संघाच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून डॉइश्‍च बॅंक संघाला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 120 धावांत रोखले.

डॉइश्‍च बॅंक संघाकडून प्रथमेश काळेने सर्वाधिक 26 धावा केल्या. यार्डी सॉफ्टवेअर संघाकडून प्रमोद दावंडे, गौतम तुळपुळे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. यानंतर यार्डी सॉफ्टवेअर संघाने विजयी लक्ष्य 16.1 षटकांत 2 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. गौतम तुळपुळेने 42 चेंडूंत 4 षटकार व 2 चौकारांसह नाबाद 53 धावा केल्या. पार्थ शहाने 28 चेंडूंत 25, तर पंकज एल.ने 27 चेंडूंत नाबाद 28 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक – डॉइश्‍च बॅंक – 20 षटकांत 9 बाद 120 (प्रथमेश काळे 26, नीतेश जोशी 17, प्रमोद दावंडे 2-24, गौतम तुळपुळे 2-15, चंद्रशेखर पांडे 1-13, प्रभुल पीके 1-17) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर 16.1 षटकांत 2 बाद 123 (गौतम तुळपुळे नाबाद 53, पंकज एल. नाबाद 28, पार्थ शहा 25, नीतेश जोशी 1-19, बिस्वरंजन साहू 1-11).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)