यार्डी संघाचा बाद फेरीत प्रवेश; एफआयएस संघाची विजयी सलामी

  पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धा 

पुणे – यार्डी संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेत बाद फेरी गाठली. एफआयएस संघाने माईंडट्री संघाचा सहज पराभव करत विजयी सलामी दिली. व्हाईट कॉपर यांच्यातर्फे ही स्पर्धे आयोजित करण्यात आली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना येथे झालेल्या सामन्यात माईंडट्री संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गामवून 91 धावा केल्या. यामध्ये पियुष रॉय याने सर्वाधिक 28 धावा जमविल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना एफआयएस संघाच्या सलामीवीरांनी धडाकेबाज सुरूवात केली. प्रशांत पोळ याने नाबाद 62 धावा तर, चेतन डोंगरे याने 12 नाबाद धावा केल्या. या दोघांनी 10.4 षटकांत आवश्‍यक 94 धावा करून संघाला 10 गडी राखून विजय मिळवून दिला. सामनावीर किताब प्रशांत पोळ याला मिळाला.

तरुण नोतानी याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर यार्डी संघाने बिटवाईझ संघाचा 108 धावांनी पराभव केला. यार्डी संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 206 धावांचा डोंगर उभा केला. अमिर राडकर (45 धावा), पार्थ शहा (37), जीवन गोसावी (नाबाद 49) व गौतम तुळपुळे (नाबाद 54) यांनी संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. या आव्हानाला उत्तर देताना बिटवाईझ संघाचा डाव 17.2 षटकांत व 98 धावांवर मर्यादित राहिला. सामनावीर तरुण नोटानी याने 11 धावांत 4 गडी बाद केले. त्याला प्रमोद धनवडे (2-17) याने चांगली साथ दिली. या विजयामुळे यार्डी संघाने ब गटातून बाद फेरी गाठली.

  संक्षिप्त निकाल –

गटसाखळी – 1) माईंडट्री – 20 षटकांत 6 गडी बाद 91 धावा (पियुष रॉय 28 (20, 4 चौकार), उदय गलांडे 17, सचिन पाटील 2-22) पराभूत वि. एफआयएस – 10.4 षटकांत बिनबाद 94 धावा (प्रशांत पोळ नाबाद 62 (42, 11 चौकार, 3 षटकार), चेतन डोंगरे 12 नाबाद); सामनावीर – प्रशांत पोळ;

2) यार्डी – 20 षटकांत 3 गडी बाद 206 धावा (अमिर राडकर 45 (37, 6 चौकार, 1 षटकार), पार्थ शहा 37 (26, 7 चौकार), जीवन गोसावी नाबाद 49 (28, 4 चौकार, 3 षटकार), गौतम तुळपुळे नाबाद 54 (25, 6 चौकार, 3 षटकार) वि.वि. बिटवाईझ – 17.2 षटकांत 10 गडी बाद 98 धावा (प्रतिक दिक्षीत 25 (19, 5 चौकार), सुरज मेहता 15, तरूण नोटानी 4-11, प्रमोद धनवडे 2-17); सामनावीर – तरुण नोतानी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)