यार्डी, मर्क्‍स संघांनी उद्‌घाटनाचा दिवस गाजवला

पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – यार्डी आणि मर्क्‍स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना पृथ्वी एडिफाईस करंडक आंतर माहिती तंत्रज्ञान टी-20 अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. व्हाईट कॉपर यांच्यातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब येथे सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्‌घाटन पृथ्वी एडिफाईसचे अध्यक्ष अभय केळे यांच्या हस्ते झाले. तरुण नोतानी याने फटकावलेल्या 80 धावांच्या जोरावर यार्डी संघाने ऍमडॉक्‍स्‌ संघाचा 3 गडी राखून पराभव केला. ऍमडॉक्‍स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 18 षटकांत 10 गडी गमावून 151 धावा केल्या. यामध्ये भावनिश कोहली (32 धावा), अविरल जैन (23) व शैलेंद्र बाकरे (20) यांनी छोट्या पण महत्वपूर्ण धावा करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली.

विजयासाठी 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यार्डी संघाची सुरुवात खराब झाली. त्यांचे दोन्ही आघाडीवीर झटपट तंबूत परतले. पण तरुण नोतानी याने 38 चेंडूत 8 चौकार व 5 षटकारांच्या सहाय्याने 80 धावा फटकावल्या. तरुणने प्रतीक शिंदे (23 धावा) याच्यासह पाचव्या गड्यासाठी रचलेल्या 43 चेंडूंतील 60 धावांच्या भागीदारीमुळे यार्डीने 19.2 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा फटकावताना विजयाची पूर्तता केली.

दुसऱ्या सामन्यात वैभव महाडीक याच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर मर्क्‍स संघाने पर्सिस्टंट संघाचा 10 गडी राखून एकतर्फी पराभव केला. फलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर पर्सिस्टंट संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा जमविल्या. यामध्ये सुधीर परांजपे (32), ऋतुराज कुलकर्णी (नाबाद 24) यांनी संघाला सव्वाशे धावांचा टप्पा गाठून दिला.

मर्क्‍स संघाने 10.1 षटकांत एकही गडी न गमावता 131 धावा करताना विजयी लक्ष्य पूर्ण केले. 29 चेंडूंत 8 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 74 धावा करणारा वैभव महाडीक मर्क्‍सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. वैभव आणि राघव त्रिवेदी (नाबाद 55) यांनी 61 चेंडूंत 131 धावांची वेगवान बागीदारी करताना मर्क्‍स संघाला विजयी सलामी मिळवून दिली.

सविस्तर निकाल-

गटसाखळी फेरी – 1) ऍमडॉक्‍स- 18 षटकांत 10 गडी बाद 151 धावा (भावनिश कोहली 32 (17, 4 चौकार, 2 षटकार), अविरल जैन 23, शैलेंद्र बाकरे 20, अंकित राव 3-20, जीवन गोसावी 2-32) पराभूत वि. यार्डी- 19.2 षटकांत 7 गडी बाद 155 धावा (तरुण नोतानी 80 (38, 8 चौकार, 5 षटकार), प्रतिक शिंदे 23, चेतन राणे नाबाद 20, हर्षद खटावकर 3-23; पाचव्या गड्यासाठी तरुण आणि प्रतीक यांच्यात 60 (43) धावांची भागीदारी; सामनावीर- तरुण नोतानी; 2) पर्सिस्टंट- 20 षटकांत 7 गडी बाद 127 धावा (सुधीर परांजपे 32 (33, 3 चौकार), ऋतुराज कुलकर्णी नाबाद 24 (21, 2 चौकार), अभिषेक राज 2-18, प्रसाद गिरकर 2-20) पराभूत वि. मर्क्‍स- 10.1 षटकांत बिनबाद 131 धावा (राघव त्रिवेदी नाबाद 55 (32, 7 चौकार, 3 षटकार), वैभव महाडीक नाबाद 74 (29, 8 चौकार, 5 षटकार); सामनावीर- वैभव महाडीक.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)