कोल्हापूर – आगामी निवडणूका तोंडावर असतानाच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. यापुढे कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय गोटात चर्चेला उधाण आला आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीन ‘गणराया अॅवॉर्ड 2017’ चा पुरस्कार वितरण सोहळा आज कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आवाजाची मर्यादा राखत साऊंड सिस्टिम लावावी, अशी विनंती गणेश मंडळांना केली. तसेच राजकीय अजेंडा हा न्यायाचा असला पाहिजे आणि न्यायाचा अजेंडा राबवता आला पाहिजे. असे म्हणत ते पुढे म्हणाले,  त्यामुळं गेल्या वर्षी माझा कोणताही अजेंडा नव्हता. त्यावेळी कोणतीही निवडणूक नव्हती. येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा मी विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर अशा कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले.

वक्तव्याचा विपर्यास – चंद्रकांत पाटील 

चंद्रकांत पाटलांनी वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा केला आहे. डॉल्बीमुक्त कोल्हापूर हा विषय होता. यावरून डॉल्बीला विरोध हा राजकीय अजेंडा नसून सामाजिक आहे, असे मी सांगितले. डॉल्बीच्या विषयावरून मला निवडणूक लढवायची नाही, असेही म्हंटले होते. परंतु, पत्रकारांनी विपर्यास करत मला निवडणूक लढवायची नाही याचीच बातमी केली, असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)