यापुढे काशी विश्वनाथ मंदिरात भारतीय पेहरावात दिसणार पोलीस 

वाराणसी : प्रसिद्ध काशी विश्वनाथ मंदिरात सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता मंदिराच्या गर्भगृहात तैनात पोलीस जवान खाकी वर्दीऐवजी धोतर-कुर्ता परिधान करून सेवा बजावणार आहेत. नवा गणवेश सोमवारपासून लागू देखील करण्यात आला. गाभाऱ्याबाहेर तैनात असणाऱया पोलिसांवर हा नियम लागू होणार नाही. भाविकांसोबत मंदिर व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

काशी विश्वनाथ मंदिर परिसर आणि बाहेरील भागात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 3 टप्प्यांमध्ये शेकडो जवान प्रतिदिन तैनात असतात. गर्भगृहात गर्दी नियंत्रित करण्यासाठी तैनात पोलिसांच्या गणवेशात चामडय़ाचा बेल्ट समाविष्ट असल्याने त्याला दीर्घकाळापासून विरोध होत होता. गर्भगृहात राहणारे सेवादार असो किंवा पोलीस, त्यांना ड्रेस कोड लागू केला जावा, अशी मागणी भाविकांनी केली होती. मंदिर व्यवस्थापनच्या बैठकीत याबद्दल अनेकदा चर्चा झाली, परंतु निर्णय होऊ शकला नव्हता. परंतु पोलीस प्रशासनाने पुढाकार घेत या दिशेने पाऊल उचलले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)