यापुढे कायमस्वरुपी टॅटूही कायमचे मिटवता येणार

नवी दिल्ली : जर तुम्ही एखादा तुमच्या शरीरावर कायमचा टॅटू काढला असेल आणि काही काळानंतर त्यात बदल करायचे असेल तर हे यापुढे शक्य होणार आहे. मेडिकल डिव्हाईस बनवणारी कंपनी ल्युमेनिस इंडियाने पहिल्यांदाच भारतात क्रांतिकारी तंत्रज्ञान ‘नॅच्युरल क्युएस’ लॉन्च केले आहे. यामुळे त्वचेचे कायाकल्प करता येणे शक्य आहे. सोबतच या तंत्रज्ञानामुळे कायमस्वरुपी टॅटूही पूर्णत: हटवता येणे शक्य आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘नॅच्युरल क्युएस’ जगातील एक उच्च दर्जाची क्यू स्विच्ड प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान प्रत्येक रंग आणि प्रत्येक आकाराचे टॅटू हटवण्यासाठी सक्षम आहे. सोबतच त्वचेवरचे केस हटवण्यासाठीही हे तंत्रज्ञान मदत करते. भारतात ‘नॅच्युरल क्युएस’ पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आले. हे तंत्रज्ञान सध्या दिल्ली स्थित डॉ. पीएन बहल स्किन इन्स्टीट्युट अॅन्ड स्कूल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये लावण्यात आले आहे. टॅटू काढल्यामुळे सैन्यात जाण्याच्या संधीही तरुणांना सोडाव्या लागल्या आहेत. अशा तरुणांसाठीही हे तंत्रज्ञान उपयोगी पडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)