यापुढील आंदोलने उपोषण, मानवी साखळीद्वारेच

मराठा क्रांती मूक मोर्चा 

गोंधळ, गैरवर्तन करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही
– 
– बदनामी करणारे भडक मेसेज “व्हायरल’ करू नयेत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.10 – जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरूवारी रात्री उशिरापर्यंत गोंधळ व गैरवर्तन करणाऱ्या आंदोलकांशी मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध नाही. त्या आंदोलकांना आम्ही त्यांना ओळखतही नाही, असा दावा मराठा क्रांती मूक मोर्चाच्या समन्वयकांनी शुक्रवारी केला.

या संदर्भात मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत सकल मराठा समाजाची भूमिका मांडली. यावेळी मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे, प्रवीण काकडे, बाळासाहेब अमराळे यांनी याबाबत माहिती दिली.

“औरंगाबाद येथे मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या समन्वयकांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दि. 9 ऑगस्ट रोजी अतिशय शांततापूर्ण आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आम्ही आंदोलन संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही व्यक्तींनी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींनी पत्रकार व पोलिसांशी जे वर्तन केले, त्याबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.’ असे स्पष्टीकरण शांताराम कुंजीर यांनी दिले.

“आंदोलनादरम्यान काहीजणांकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे समाज बदनाम होत आहे. त्यामुळे यापुढील काळात आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक आचारसहिंता तयार केली जाणार आहे. कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे कोणतेही आंदोलन करू नये. तसे करण्याचा कोणीही प्रयत्न केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही. तसेच मराठा समाजाची, मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाची बदनामी होईल, असे भडक किंवा कोणतेही प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर “व्हायरल’ करू नये. यापुढील काळात होणारी आंदोलने ही रस्त्यावर होणार नाहीत, येत्या 15 ऑगस्ट रोजी चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे,त्यानंतर सुद्धा चक्री उपोषण किंवा मानवी साखळी अशा स्वरुपाची आंदोलने असणार आहेत. त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याने आचारसंहितेचे पालन करणे आवश्‍यक आहे,’ असेही यावेळी कुंजीर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)