…यानिमित्ताने जुन्या आठवणी पुन्हा उजागर झाल्या – शरद पवार

गणपतीपुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून कोकण दौऱ्यावर आहेत. आज या दौऱ्यादरम्यान पवार यांनी गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला भेट देऊन देवस्थान विकासाबाबत चर्चा केली. पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गणपतीपुळे देवस्थानचा पहिला विकास आराखडा मंजूर झाला होता आणि त्यांच्या उपस्थितीत मंदिराचे कलशारोहण झाले होते.

दरम्यान शरद पवार म्हणाले, कोकण दौऱ्यात विविध उपक्रमांना भेट दिली. कोकणात ज्या नव्या गोष्टी आल्या आहेत, त्याबाबत माहिती घेतली. आज सकाळी गणपतीपुळे गणपती मंदिराला भेट दिल्यावर देवस्थान विकासाबाबत चर्चाही झाली. देवस्थान पंच समितीचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली. डॉ. भिडे यांनी दाखवलेल्या काही जुन्या फोटो अल्बममुळे आठवणींना उजाळाही मिळाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आधीही काही वर्षांपूर्वी गणपतीपुळ्याला भेट दिली होती. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना गणपतीपुळे देवस्थानचा पहिला विकास आराखडा मंजूर झाला होता, याचे आजही समाधान वाटते. या मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्यही मला लाभले होते, या जुन्या आठवणी यानिमित्ताने पुन्हा उजागर झाल्या.

रविवारपासून सुरू असलेल्या कोकण दौऱ्यात विविध उपक्रमांना भेट दिली. कोकणात ज्या नव्या गोष्टी आल्या आहेत, त्याबाबत माहिती…

Posted by Sharad Pawar on Tuesday, 4 December 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)