परिंचे – यादववाडी (ता. पुरंदर) विद्यालयातील हुशार व गरजू विद्यार्थांना बी.एस.एन.एल.चे सेवानिवृत्त अधिकारी बाळासाहेब यादव यांच्या वतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी विठ्ठल ताकवले, महादेव खेंगरे, धनंजय ताकवले, शांताराम यादव, मनोज ताकवले, प्रकाश कुंमकर, दत्तात्रय शिवतारे, शिवाजी यादव, संतोष शिवतारे, सर्जेराव ताकवले, सतीश शिंदे, बाळासाहेब चौधरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक दिलीप नेवसे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बोरकर यांनी केले तर वसंत ताकवले यांनी आभार मानले.