यादववाडी येथे शिक्षण परिषद उत्साहात

परिंचे- मराठी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांची गुणवत्ता वाढल्यास नागरिकांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार असून पालकांचा व ग्रामस्थांचा विश्वास ही वाढणार आहे. पुरंदर तालुक्‍यातील भटक्‍या जमाती मधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून तालुका शालाबाह्य मुक्त मुल करावा, असे आवाहन जिल्हा परिषदचे सदस्य दिलीप यादव यांनी केले.
यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयात, माहूर, परिंचे, यादववाडी केंद्राच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षण परिषदेत यादव बोलत होते. याप्रसंगी केंद्रप्रमुख राजेंद्र कुंजीर, सुरेश मोरे, अनिल चाचर, संतोष शेंडकर, अब्दुलगणी तांबोळीख, संदीप कुंभार व श्रीधर वाघोले आदी उपस्थित होते. यावेळी केंद्रातून बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
दिलीप यादव म्हणाले की, भविष्यात शिक्षकांच्या बदल्या व अन्य प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी संगणक, संरक्षण भिंती, शाळा दुरुस्ती अशा सुविधा पुरविण्यासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही. यावेळी त्यांनी शाळेतील कमी होत चाललेल्या पटसंख्यावर चिंता व्यक्त केली.
शिक्षण चळवळीचे कार्यकर्ते संतोष शेंडकर म्हणाले की, शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत हक्क असून हा कायदा अमलात येऊन आठ वर्ष झाल्यावरही आपल्या परिसरातील अनेक मुले वीट भट्टी, हॉटेल, दुकानांमध्ये काम करताना दिसत आहेत. त्यांना शाळेत आणण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)