यात्रेतील फुकटचंबूंची दुकानदारी बंद करणार

नगराध्यक्ष तुषार विरकर : जागा विकणाऱ्यांवर कारवाई करणार

म्हसवड – दरवर्षी येथील सिध्दनाथ यात्रेत दुकानसाठी जागा मिळवून देतो, असे सांगुन बाहेरुन येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून हजारो रुपये उकळुन स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्यांची टोळी म्हसवड शहरात कार्यरत झाली आहे. या टोळक्‍यांचा असला गोरखधंदा यंदापासून बंद करणार असून असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबधीत दोघांवरही कारवाई करणार असल्याचे नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी स्पष्ट केले आहे.

येथील ग्रामदैवताच्या यात्रा दरवर्षी मोठ्या प्रमाणावर शहरात भरते. या यात्रेनिमित्त शहरात स्थानिकसह बाहेरहून अनेक छोटे-मोठे व्यावसायिक व्यावसायानिमित्त शहरात येतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याचे काम दरवर्षी नगरपरिषद करीत आहे. प्रत्यक्षात, त्याठिकाणी दुकान न लावता ती जागा परस्पर दुसऱ्यांना अव्वाच्या सव्वा किमतीने विकत आहेत. या टवाळखोरांचा हा गोरखधंदा अनेक वर्षापासून बिनबोभाटपणे सुरू आहे.

फुकटचंबूंची असली बिनकामाची दुकानदारी यंदापासून बंद करणार आहोत. यात्रेनिमित्त येणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेकडून अगदी वाजवी भाडे आकारून जागा दिली जाते. त्यामुळे सर्वांनाच यात्रेत जागा मिळते. मात्र, काहीजण याचाच गैरफायदा घेत असून पालिकेकडे अशी वाजवी रक्कम भरुन जागा भाडेतत्वार घेवून ती पुढे दुप्पट, चौपट रक्कम घेवून दुसऱ्याला देण्याचा प्रकार सुरू आहे. ज्या व्यावसाईकांना यात्रेत पालिकेच्या जागेत दुकाने लावायची आहेत त्यांनी थेट पालिकेशी संपर्क साधावा. कोणाकडुन परस्पर जागा दुकानासाठी घेतली अथवा कोणी ती परस्पर विकली तर त्या दोघांचीही जागा पालिकेकडुन ताब्यात घेतली जाईल, असा खणखणीत इशारा विरकर यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)