यात्रेकरू अभावी जम्मूतील अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवली

जम्मू – सध्या सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंचा प्रतिसाद सध्या कमी झाला असून यात्रेकरूंअभावी जम्मूहून सोडण्यात येणारी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. तेथे यात्रेकरूंची पुरेशी संख्या झाली की पुन्हा यात्रेला या मार्गावरून अनुमती दिली जाईल अशी माहिती यात्रा प्रबंधक समितीच्यावतीने देण्यात येते. दरम्यान बालताल मार्गे मात्र यात्रा सुरू ठेवण्यात आली आहे.

ही यात्रा 60 दिवसांची असून तिचा समारोप 26 ऑगस्ट रोजी होत आहे. काल बालताल मार्गेही 43 यात्रेकरूंच्या छोट्या जथ्याला अनुमती देण्यात आली आहे. अमरनाथचे बर्फाचे लिंग बऱ्याच अंशी वितळल्यामुळे भाविकांची गर्दी कमी झाली असल्याचे सांगण्यात येते. 28 जून पासून ही यात्रा सुरू असून तेथे आत्तापर्यंत 2 लाख 83 हजार 140भाविकांनी भेट देऊन दर्शन घेतले आहे.

श्रीनगर ते पेहेलगाम मार्गावरून साधुंचा एक जथ्था पवित्र छडी म्हणजेच छडी मुबारक घेऊन अमरनाथच्या दर्शनाला जाते तेव्हा या यात्रेचा समारोप होतो. काल पासून या छडी मुबारकचा प्रवास सुरू झाला आहे. रात्रीचा मुक्काम करून ही छडी आज पुढील मार्गावर रवाना झाली आहे. ती तेथे 26 ऑगस्टला पोहचेल. आणि त्या दिवशीच यात्रेचा समारोप होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)