यात्रा कालावधीत बेजबाबदारपणा नको : जिल्हाधिकारी सिंघल

नियमांच्या अंमलबजावणीचे अधिकाऱ्यांना आदेश; भाविकांनाही सहकार्याचे आवाहन

उंब्रज – लाखो भाविकांचे आराध्य दैवत असणाऱ्या पाल, ता. कराड येथील खंडोबा-म्हाळसा देवाची (विवाह सोहळा) यात्रा 18 जानेवारी रोजी साजरी होत असून या सोहळ्यात महाराष्ट्रासह, आंध्र, कर्नाटक येथून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यासाठी यात्रेचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला असून यात्रेचे मागील सर्व नियम पूर्ववत करण्यात आले असून विविध उपाययोजना व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामस्थ व भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. पाल, ता. कराड येथील खंडोबा यात्रेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची मुख्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंगल, आ. बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ व मानकरी यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सरपंच जगन्नाथ पालकर, उपसरपंच अंजली लवंदे, यात्रा कमिटी अध्यक्ष प्रतिभा पवार, संजय काळभोर, ग्रामस्थ उपस्थित होते.

सिंघल म्हणाल्या, प्रत्येक विभागाने यात्रा कालावधीत आपआपली जबाबदारी पार पाडावी. तसेच पाण्याचे कोणताही स्तोत्र दूषित असता कामा नये. अन्नातून कोणतीही विषबाधा होऊ नये. यासाठी शंभर टक्के तपासणी करण्यात यावी. अशा सक्त सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच स्वच्छतेच्या बाबतीत हयगय चालणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आ. बाळासाहेब पाटील यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक वर्षी सुधारणा झाली आहे. ही यात्रा मोठ्या स्वरुपात पार पडत असताना चांगल्या सोयीसुविधा देण्यात येतात असेच सहकार्य प्रशासनाने व ग्रामस्थांनी करावे व यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडावी. मिरवणूक मार्गावरील कायमस्वरुपी पुलासाठी प्रयत्न करुन वेगवेगळ्या विभागाकडून निधी उपलब्ध करुन घेतला जाईल असे सांगितले.

जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख म्हणाले, पोलीस विभागाचे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. मानकऱ्यांना प्रवेशासाठी वेगळे प्रकारचे पास देण्यात येतील. तर स्थानिक पोलीस ठाण्याचे कर्मचारी मंदीर परिसरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येतील तसेच यात्रा उत्साहात व सुरक्षित पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे काम कडकच राहणार असल्याचे यांनी सांगितले.
प्रांताधिकारी हिम्मत खराडे म्हणाले, ग्रामस्थांनी जी कामे सुचवली आहेत. ती यात्रेच्या अनुषंगाने महत्वाची आहेत. ती 12 जानेवारीपर्यंत पुर्ण केली जातील. प्रत्येक विभागाचा एक अधिकारी कंट्रोल रुममध्ये पुर्ण वेळ उपलब्ध असला पाहिजे. यामध्ये सर्व विभागाच्या अधिकारी यांचे संपर्क नंबर असणार आहेत.

पोलीस उपाधिक्षक नवनाथ ढवळे म्हणाले, पार्किंग जागा व एसटी बसस्थानक तसेच खासगी वाहनांसाठी स्वतंत्र पार्कींग व्यवस्था झाली आहे. मानकऱ्यांना वेगवेगळ्या रंगाचे पास दिले जातील. मिरवणूक मार्ग मोकळा राहण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर राहणार आहे. यावेळी मंदीरासमोरील भाविकांची गर्दी तसेच पार्कींग, वाळवंटातील दुकाने, तारळी नदीपात्रातील पूल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोलीस बंदोबस्त मानकऱ्यांची व्यवस्था, वीज यासह अनेक मुद्यावर तसेच यात्रा सुरक्षिततेच्या दृष्टीने उपस्थित झालेल्या विविध मुद्यावर चर्चा होऊन संबंधित विभागामार्फत उपाययोजना व चर्चा झाली.

पाल देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष तथा मानकरी देवराज पाटील यांनी वाळवंटात दरवर्षी मिरवणूक मार्गावरील तात्पुरता भराव पुलाचा खर्च वाया जात असून याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यासाठी याठिकाणी खास बाब निधीतून कायमस्वरुपी पूल व्हावा तसेच काशिळ-पाल मार्गावरील एस. टी. स्टॅन्ड होणे गरजेचे आहे. यासाठी पुनर्वसनाची जागा व गावठाणची जागा यांचा प्रश्‍न मार्गी लागला तर एस. टी. स्टॅन्ड लवकरच होईल. यावर्षी पासून यात्रा कालावधी संपल्यानंतर कृषी प्रदर्शन आयोजीत करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. आभार देवराज पाटील यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)