याचिका स्विकारल्याने वैद्यकिय क्षेत्राला काहिसा दिलासा

मुळ याचिके बरोबरच सुनावणी ः मनपा आयुक्तांना म्हणणे सादर करण्याचे आदेश

नगर – उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशा नुसार शहरातील रुग्णालयांच्या बेकायदा बांधकामावर हातोडा टाकण्याची कारवाई गेल्या पंधरवड्या पासुन सुरू असल्याने वैध्यकिय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली . दि.10 रोजी उच्च न्यायालयाने मनपाकडुन कारवाईचा अहवाल मागविला होता त्यावेळी इमाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर स्थगिती न देता मनपाच्या कारवाईला हिरवा कंदील दाखविला होता मात्र डॉक्‍टरांच्या वतीने स्वतंत्र दाखल केलेली याचिका स्विकारून तिची सुनावणी मुळ याचिके बरोबर करण्याचे न्यायालयानेआदेश दिल्याने वैद्यकिय क्षेताला काहिसा दिलासा मिळाला आहे.

रुग्णालयाच्या बेकायदा बांधकामावर सुरू असलेल्या कारवाई बाबत ईमाने दाखल केलेल्या याचिके वर स्थगिती न मिळाल्याने नेत्र तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ,डॉ. सुधा कांकरिया यांनी ऍड सत्यजित बोरा यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वतंत्र याचिका दाखल केली. न्यायलयाने हि याचिका स्विकारली आहे व तिचा समावेश मुळ जनहित याचिकेत करून महापालिका आयुक्तांना म्हणणे सादर करण्याची नोटीस दिली आहे.

ऍड. सत्यजित बोरा यांनी या याचिकेत बेकायदा बांधकामावर कारवाई म्हणजे बांधकाम पाडणे नव्हेतर दंड ,नियमानुकुलता असे अनेक पर्याय व अधिकार मनपा आयुक्तांना आहेत त्याचा वापर करून वैद्यकिय व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी विनंती न्यायालयाला केली असल्याने हि याचिका दाखल करून घेवून मनपा आयुक्तांना म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे वैद्यकिय व्यवसायिकांना दिला मिळाला आहे असे सांगुने वैद्यकिय व्यावसायिकांना जास्तीतजास्त स्वतंत्र याचिका दाखल करण्याचे आवाहन ईमाच्या अध्यक्षा रझिया निसार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)