याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या गांधींना पाठिंबा नाही

संजय राऊत यांचा गोपाळकृष्ण गांधी यांना विरोध

नवी दिल्ली: कॉंग्रेसच्या उपराष्ट्रपतीपदाच्या गोपाळकृष्ण गांधी यांना शिवसेना खासदार संजय राउत यांनी विरोध केला आहे. कारण मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या पक्षाला उपराष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
काँग्रेसकडून गोपालकृष्ण गांधी उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या आमदार- खासदारांनी राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी झालेल्या मतदानानंतर संजय राऊत यांनी गोपालकृष्ण गांधी यांना तीव्र विरोध दर्शवला.
“मी सोनिया गांधींना विचारु इच्छितो, की संकुचित विचारधारा म्हणजे काय? मॅडमजी, कशाच्या आधारे गोपालकृष्ण गांधींना उमेदवारी दिली? मुंबईत 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी, याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या गोपाळकृष्ण गांधी यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. याशिवाय “गोपालकृष्ण गांधी यांनी याकूबची फाशी रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहिले होते. याकूबची फाशी होऊ नये असं त्यांनी देशासमोर म्हटले होते. त्यामुळे संकुचित विचाराचे कोण आहे, हे सोनिया गांधींनी सांगावे”, असेही वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)