‘यांना’ सत्तेचा माज आलाय, राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई: T१ उर्फ अवनी वाघिणीला ठार मारल्यावरून सध्या राज्यभर एकच वाद सुरु आहे. अवनी वाघिणीला गोळी घालून ठार केल्याने राज्यसरकारवार चोहीबाजूने टीकेची झोड उठली आहे. दरम्यान आज या वादामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

“अंबानीसाठी देश विकायला काढलाय का?” असा थेट प्रश्न करत त्यांनी अंबानींच्या प्रकल्पासाठी वाघिणीला मारल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. “वाघिणीला बेशुद्ध करून तिचे संवर्धन करता आले असते. ठार केलेल्या वाघिणीचे बछडे देखील सापडत नाहीयेत, त्यांचं काय झालं असेल? एका जिवाबरोबर आणखीन जीव जाणार का?राज्यसरकारला सत्तेचा माज आला असल्याने आम्ही काही केलं तरी आम्हाला काही होणार नाही अशा अविर्भावात ते वागत आहेत मात्र घोडेबाजार जवळच असल्याने सरकारचा माज उतरवायला हवा.” असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)