यांना कुणी तरी आवरा

मयूर सोनावणे 

सध्या दिवाळी सुट्टी संपल्याने पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये कामासाठी असलेले नोकरदार वर्ग पुन्हा परतू लागला आहे. त्यामुळे सातारा बसस्थानक ओसंडून वाहू लागले आहे. प्रवाशांची संख्या अधिक असल्याने आणि बसेसची संख्या अपुरी असल्यानेमुळे एसटी प्रशासनावर याचा ताण आला आहे. याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून घेतला जात आहे.

एरव्ही तीनशे-चारशे रुपये घेणारे हे खासगी वाहन चालक-मालक प्रवाशांची कोंडी करुन आठशे ते हजार रुपये मागत आहेत. या प्रकारामुळे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची नियमावली नाही का? आणि जर असेल तर त्याची पायमल्ली होत असतानाही संबंधित प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असे प्रश्‍न प्रवाशांसह सर्वसामान्याना पडणे साहजिकच आहे. उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी तसेच वर्षभरातील काही महत्वा सणासुदीला आपल्या मुळ गावी येणारा नोकरदार वर्ग मोठा आहे. गावी येत असताना आणि पुन्हा शहराकडे जात असताना या नोकरदार वर्गाची वाहनधारकांकडून लुट ठरलेली असते. हे संबंधित प्रशासनालाही माहित आहे.

एरव्ही सर्वसामान्यांना नियमांचा धाक दाखवणारे हे प्रशासन या खासगी प्रवासी वाहनांची पाठराखण का करत आहे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित राहत आहे. तसेच एसटी बसेस प्रमाणेच खासगी बसेस वाहनधारकांनीही ठराविक तिकट दर आकारावा, अशी किमान अपेक्षा सर्वसामान्य प्रवासी वर्गाची आहे. यानी या अपेक्षाला संबंधित प्रशासनाने नजेरआड न करता त्यादृष्टीनो ठोस कार्यवाही करुन शिस्तीचा धडा गिरवावा, जेणेकरुन प्रवाशांची लुट होणार नाही आणि त्यांनाही जनतेची सेवा केल्याचा आनंद मिळेल, असे म्हटले तर वावगे ठरु नये!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)